यल्लम्मा देवी यात्रे च्या आरक्षित जागा बळकावल्या | यल्लमादेवी प्रतिष्ठानकडून पोलीसात तक्रारी देऊनही अतिक्रमण सुरूचं

0जत,संकेत टाइम्स : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. यल्लमादेवी यात्रेसाठीच्या अरक्षित जागेवर  धनदांडग्याचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढू लागल्याने देविची यात्रा भरविण्यात अडचणी येणार असल्याने भाविकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

श्री.यल्लमादेवी ही जत नगरिची ग्रामदेवता असून महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.या देविची दरवर्षी मार्गशिर्ष महिन्यात मोठी यात्रा भरते. 

जतचे डफळे राजघराणेचे श्री. यल्लमादेवी मंदिर हे खासगी देवस्थान आहे.सौंदत्ती यल्लमा ते कोकटनूर ,जत अशी देविची मोठी महती आहे. जतच्या श्रीमंत डफळेनी देविवर असलेल्या भक्ती व श्रध्देपोटी सौंदत्ती येथील श्री. यल्लमादेवीला प्रसन्न करून जतला घेऊन आल्याची अख्यायिका आहे. 


पूर्वी श्री.यल्लमादेवीची यात्रा ही जत संस्थानामार्फत भरविली जात होती.त्यानंतर ही यात्रा जत ग्रामपंचायतीच्यावतीने भरविण्यात येत होती. सध्या ही यात्रा श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जत यांच्याकडून भरविण्यात येते. या यात्रेला महाराष्ट्र,गोवा,राज्याबरोबरच कर्नाटक, तामिळनाडू,आंध्रप्रदेश येथील भाविक  येतात.त्यामुळे ही यात्रा प्रसिद्ध अशी यात्रा गणली जात आहे.खिलार जनावरांची मोठी यात्रा म्हणून ही या यात्रेकडे पाहीले जाते.


या यात्रेसाठी तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी यानी 150 एकर जागा श्री. यल्लमादेवी यात्रेसाठी अरक्षित करून तसे आदेश डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट ऑर्डर नं.व्ही. पी.टी.एस.आर.24 तारीख  5/8/1954 व गव्हर्मेंट जी.आर.नं.पी.एच.डी.2155 तारीख 24/8/1995 चा शासन निर्णय जाहीर केला असून तो आदेश असा आहे.

कसबे जत येथिल ग्रामपंचायत हद्दीतील जत येथिल श्री.यल्लमादेवी यात्रेकरिता राखून ठेवलेले सर्वेनंबर असे जुना सर्वेनंबर व कंसामध्ये त्याचा नविन सर्वेनंबर असे 494(436),499(438), 506(448),508(450),510(452),521(463),524(466),526(469),527(470),529(472),531(474),495(437),505(447),507(449),509(451),511(453),522(464),525(467),526 ब (468),530(473),तसेच सर्वेनंबर 521 नविन सर्वेनंबर 463 पैकी 2 अ/2ब/2 अ-1 ही जमिन श्री. यल्लमादेवी यात्रा व दसरा शिलंगण या धार्मिक कारणाकरिता राखून ठेवली आहे. असा जी.आर.जाहीर केला आहे. व यामध्ये अटीही घातल्या आहेत. 

Rate Card

या अटिनुसार कसबे जत येथिल ग्रामपंचायत हद्दीतील वर नमुद केलेल्या जमिनी श्री. यल्लमादेवी यात्रेकरिता यात्रेची हद्द म्हणून राखून ठेवलेल्या असून सदर जमिनी कार्तिक अमावशा ते मार्गशिर्ष अमावशा अखेर मोकळ्या ठेवणेच्या असून या उक्त जमिनित मार्गशिर्ष वद्य नवमी ते अमावशाअखेर (दोन्ही दिवस धरून) सात दिवस यात्रा  कालावधी राहील. त्या अर्थी उक्त अनुसूचिमधिल जमिनीमध्ये हितसबंध असणारे सर्वांना सुचित करण्यात येते की,श्री. यल्लमादेवी यात्रेकरिता सरकारने अरक्षित केलेल्या जमिनीची पैसेवारीने अगर प्लाॅट पध्दतीने विक्री, अभिहस्तांतरण,देवाण घेवाण या व्दारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनीची विल्हेवाट लावणे सबंधात कोणतेही करार वगैरे अगर खरेदीपत्र वगैरे करता येणार नाही. अशा प्रकारे केलेले सर्व खरेदी व्यवहार बेकायदेशीर असून या जमिनीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. व झालेली बेकायदेशीर बांधकामे काढून टाकणेचा अधिकार ग्रामपंचायतीस आहे.

वरिल प्रमाणे आदेश दिले असलेतरी येथील धनदांडग्यानी डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट यांच्या आदेशाचे उल्लंघन करून श्री. यल्लमादेवी यात्रेकरिता अरक्षित असलेल्या जमिनीवर, गुंठेवारी पध्दतीने प्लाॅट पाडून त्याची जाहीरातबाजी सुरू केली आहे. 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. यल्लमादेवी यात्रेकरिता अरक्षित असलेल्या जमिनीवर अतिक्रमणे सुरू असल्याने यापुढील काळात देविची यात्रा भरविण्यात अडचणी येणार असल्याने भाविकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


या संदर्भात श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष मा.श्रीमंत शार्दुलराजे डफळे यानी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट सांगली यांनी जत येथिल श्री. यल्लमादेवी यात्रेकरिता 150 हेक्टर जमिन अरक्षित केली असून तसा जी.आर.ही.प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे. श्री. यल्लमादेवी यात्रा भरण्याच्या ठिकाणाचा नकाशाही तयार करण्यात आला आहे. 

श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतने ज्या जमिनी यात्रेकरिता प्रशासनाने अरक्षित केल्या आहेत. त्या जमिनीचे पूर्वीचे जुने व आताचे नविन सर्वेनंबर लिहून यात्रा  ठिकाणी सबंधित मिळकती या श्री. यल्लमादेवी यात्रेकरिता अरक्षित असून या जमिनीवर कोणीही कोणत्याही प्रकारे अतिक्रमणे करू नयेत.व पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करू नये.केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे डिजीटल प्लेक्स जागोजागी लावले होते.पण काही समाजकंटकानी ते प्लेक्स फाडून काढून टाकले असलेचे ट्रष्टचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी सांगितले व जे लोक श्री. यल्लमादेवी यात्रेसाठी अरक्षित केलेल्या जमिनीवर अतिक्रमणे करित आहेत. त्यांच्या विरोधात जत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. असेही श्री.डफळे यांनी सांगितले आहे.

श्री.यल्लम्मादेवी मंदिरालगतच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण कंपाऊड मारले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.