सेवा क्षेत्राचा विस्तार होतोय | – आमदार विक्रमसिंह सावंत : जतमध्ये अभिराज फायनान्शियल सर्विसेसचे उद्घाटन

0
14

जत : आधुनिक कालखंडामध्ये देशात अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानावर आधारित नवीन सेवा क्षेत्राची निर्मिती व विस्तार वेगाने होत असुन अनेक वित्तीय संस्था, बँका, विमा कंपन्या नागरिकांना उत्तम व जलद सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अभिराज फायनान्शियल सर्विसेसच्या माध्यमातून जत शहर व तालुक्यातील नागरिकांना उत्तम व जलद सेवा मिळेल, असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केले. ते जत शहरातील तुकाराम सन्नके यांच्या अभिराज फायनान्शियल सर्विसेस या जीवन विमा (LIC), वाहन विमा (Motor), आरोग्य विमा (Mediclaim) व म्युचुअल फंड व CSC याची सेवा देणाऱ्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अधिक बोलताना ते म्हणाले, सेवा क्षेत्रास खरी चालना ही १९९० च्या दशकातील झालेल्या सुधारणांद्वारे मिळाली आहे. देशाच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. भारताच्या जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचे योगदान ५० टक्क्यांहून अधिक आहे. जत तालुक्यातही सेवा क्षेत्राचा विस्तार होत असल्याचा आनंद आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
अभिराज फायनान्शियल सर्विसेस या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी LIC चे विकास अधिकारी नितीनकुमार पारेकर, Nj Wealth म्युचुअल फंडचे शाखाधिकारी प्रदीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे संस्थापक ज्योतीराम बोबडे, लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलचे व्यवस्थापक डॉ. विद्याधर कीट्टद, माजी नगरसेवक निलेश बामणे, प्रभावी वक्ते राजेंद्र माने, लेखक व पत्रकार मच्छिंद्र ऐनापुरे, सामाजिक कार्यकर्ते मोहन माने- पाटील, श्रीकांत सोनावणे, सागर शिनगारे, जमगे कॉम्प्लेक्स प्रोप्रायटर सुधीर जमगे, डॉ. नितीन पतंगे, पत्रकार मनोहर पवार, प्रा. कुमार इंगळे, प्रा. प्रकाश माळी, प्रा. राजेंद्र खडतरे, शिंदे जनरल स्टोअरचे प्रोप्रायटर मोहन शिंदे, तानाजी शिंदे, अमर जाधव, दामोदर कांबळे, समीर कलादगी, अक्षय अभंगे, संगमेश्वर अभंगे, योगेश देसाई, उमेश सन्नके, भारती साळे, सुनीता पाटील, लक्ष्मी साळे, लिंबाजी साळे, यासह सन्नके कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होते.

अभिराज फायनान्शिअल सर्विसेस या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार विक्रमसिंह सावंत, सोबत सन्नके कुटुंबीय

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here