डफळापूर : श्रीपती शुगर अँण्ड पॉवर लि. डफळापूर- कुड्नुर येथे सन २०२४-२५ गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या यंत्रणेच्या कराराचा प्रारंभ कारखाना कार्यस्थळावर झाला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र आप्पा लाड उपस्थित होते.यावेळी विठ्ठल आप्पासो दुधाळ, साधाशिव भैयाजी हजारे, दत्तू आण्णाप्पा पांढरे, दिगंबर बाबू गोपने, जगन्नाथ बाळकृष्ण शेंडगे, शिवाजी शंकर माळी, आप्पासो केसकर, महादेव बापू शेजोळे, हनुमंत धोंडीराम पाटोळे आदी नऊ तोडणी वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांना कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र आप्पा लाड यांचे हस्ते करारपत्र देऊन करारबद्ध करण्यात आले.
यावेळी लाड म्हणाले, येणारा गळीत हंगाम सुरु करण्याच्यादृष्टीने सर्व तयारी सुरु केली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांच्या उसाच्या नोंदी घेण्याचे काम शेती विभागामार्फत सुरु असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या नोंदी कारखान्याच्या शेती विभागाकडे कराव्यात.तसेच उस तोडणी वाहतूक करणाऱ्या सर्व कंत्राटदारांनी कारखान्यास करार करावे.यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर महेश जोशी यांचेसह सर्व अधिकारी,ऊस वाहतूकदार व शेतकरी उपस्थित होते.