व्यापक देशव्यापी रक्तदान अभियान व सत्संग समारोहांचे आयोजन
सांगली : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात ‘मानव एकता दिवस’ मुख्य समारोहाचे आयोजन बुधवार, दि.24 एप्रिल, 2024 रोजी ग्राउंड नं.2, निरंकारी चौक, बुराड़ी, दिल्ली येथे करण्यात आले आहे. हा दिवस युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांचे परोपकारी जीवन आणि त्यांच्या लोककल्याणकारी भावनेला समर्पित आहे. या कार्यक्रमात दिल्ली व आजुबाजुच्या राज्यांमधून हजारोंच्या संख्येने श्रद्धालु भक्त सहभागी होऊन बाबा गुरबचनसिंहजी आणि मिशनचे अनन्य भक्त चाचा प्रतापसिंहजी यांना आपली श्रद्धा सुमने अर्पण करतील आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त करण्याबरोबरच सद्गुरुचे अनमोल प्रवचनही श्रवण करतील.
त्याचबरोबर सातारा झोन मध्ये सांगली,खानापुर व वाळवा सेक्टर अंतर्गत सांगली येथे महादेवजी शेलार जत येथे महादेवजी शिंदे,कवठेमहांकाळ येथे रेखाजी रायजादे बिरणवाडी येथे श्रीमंतजी जाधव विटा येथे अविनाशजी जाधव नेर्ले (वाळवा) येथे नंदकुमारजी झांबरे यांचे उपस्थितीत मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव आणि समाजकल्याण विभागाचे प्रभारी आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की सद्गुरुच्या असीम कृपेने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अवघ्या विश्वामध्ये विविध ठिकाणी संत निरंकारी मिशनची समाजकल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक स्तरावर आयोजन केले जाईल ज्यामध्ये मानवतेच्या भल्यासाठी रक्तदात्यांकडून रक्तदान करुन नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत केले जाईल. दिल्लीमध्ये आयोजित या शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यासाठी विविध इस्पितळांचे प्रशिक्षित डॉक्टर्स आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीची टीम सहभागी होणार आहे. त्याबरोबरच इतर राज्यांमध्ये तेथील स्थानिक इस्पितळांचे डॉक्टर्स व नर्स रक्त संकलित करण्यासाठी उपस्थित राहतील. याशिवाय सर्व ठिकाणी मानव एकता दिवसानिमित्त सत्संग समारोहाचेही आयोजन करण्यात येईल. त्याचबरोबर सांगली,विटा ,नेर्ले,या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
युगप्रर्वतक बाबा गुरबचनसिंहजी यांनी आपले संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित केले; त्यांनी ब्रह्मज्ञानाद्वारे मानवाला मानवाशी जोडून प्रेम व गोडीगुलाबीने नांदण्याची निर्मळ धारा प्रवाहित केले व प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपले स्थान निर्माण केले. प्रत्येक भक्ताच्या जीवनाला वास्तविक रूपात एक व्यावहारिक दिशा प्रदान केली ज्यासाठी मानवता त्यांची सदैव ऋणी राहील. त्यांची दिव्य शिकवण वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सत्य ज्ञानाच्या रूपात सर्वत्र प्रवाहित करत आहेत ज्याच्या प्रकाशाने प्रत्येक मानव आपले जीवन सकारात्मक रूपात कल्याणकारी बनवत आहे.
रक्तदान महादान – सेवेचे लक्ष्य महान
उल्लेखनीय आहे, की युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांनी सन् 1986 मध्ये सुरु केलेल्या रक्तदानाच्या परोपकारी मोहिमेने आता महाअभियानाचे रूप धारण केले असून त्याचा चरमोत्कर्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. या शिबिरांमध्ये आतापर्यंत 13,31,906 युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले असून या सेवा निरंतर जारी आहेत.
आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रात प्रसिद्धीसाठी.