जत : सांगली लोकसभेसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुचंडी जि.प. गटाची रावळगुंडवाडी (ता.जत) येथे प्रचारार्थ गावातून पदयात्रा व कोपरा सभा पार पडली यावेळी मुचंडी जि.प गटातील नागरिकांशी संवाद साधला. उत्स्फूर्त प्रतिसादासह जल्लोषपूर्ण वातावरणात हि सभा संपन्न झाली. गावातील माता भगिनींनी औक्षण करत स्वागत केले त्याबद्दल त्यांचे आभार.यावेळी उपस्थित सर्व मतदारांशी संवाद साधून “लिफाफा” ह्या माझ्या अधिकृत चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने विजय मिळवून देण्याचे आवाहन केले. यावेळी आप्पाराय बिराजदार, सांगली बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, श्रीधर हिरगोंड, लिंगप्पा हिरगोंड आदी मान्यवर उपस्थित होते.
जत तालुक्याला भाजप सरकार काहीही देऊ शकलं नाही. पाणी मिळत नसल्याने ६५ गावं कर्नाटकात जाणार होती, मात्र आ. विक्रमादादांनी पुढाकार घेतल्यामुळे ही गावं जायची थांबली. या लोकसभा निवडणुकीत प्रमुख दोन्ही उमेदवार हे भाजपचेच आहेत. निवडणूक एकहाती जिंकता यावी यासाठीच पडणारा उमदेवार उभा केला आहे. जत तालुक्यावर अन्याय करणाऱ्या भाजपला धडा शिकविण्याची संधी तुम्हाला आहे. मला विश्वास आहे की, जत तालुक्यातील जनता यावेळी भाजपला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.
रावळगुंडेवाडी ता.जत येथे विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली.