विलासराव जगतापांच्या गाडीवर हल्ला | पाच हल्लेखोरांवर तक्रार

0
7

जत : भाजपाला सोडचिठ्ठी देत कॉग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करत असलेले माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर मिरवाड ते डफळापूर दरम्यान बुधवारी रात्री हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.हल्ला केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात विलासराव जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे.

 

बुधवारी जिरग्याळ येथील बैठक संपवून सायंकाळी 06.30 वाजता जगताप व कार्यकर्ते चार चारचाकी वाहनातून येत असताना मिरवाड ते डफळापूर दरम्यान मधील हांडेमळा येथे ही घटना घडली आहे.मिरवाड येथून स्वतः जगताप, संग्राम जगताप, सुनील तुकाराम छत्रे असे गाडीतून जात असताना अचानक 5 इसम दोन दुचाकीवरुन आले. त्यातील एका दुचाकी हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी के एम. 10 सी डी 2203 यावरुन येवुन जगताप यांच्या कारचे उजव्या बाजूस त्यांच्या हातातील रॉडने काचेवर हल्ला केला.

 

 

त्यावेळी गाडीचे उजव्या आरश्यावर रॉड लागल्याने आरसा पूर्ण फूटला असता चालक सागर याने तात्काळ कार रस्त्याचे  बाजुला घेतली. त्यावेळी माझेसोबत असलेला सुनील तुकाराम छत्रे याने मला आमचे गाडीवर तसेच आमच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले इसम बाबु हराळे, सावंता पाटील, राहुल संकपाळ, अन्नु ढोले व मेजर संकपाळ सर्व रा. जिरग्याळ ता.जत येथील असल्याचे सांगितले.

 

हे इसम हे आम्ही प्रचार करीत असलेल्या विशाल पाटील याचे विरोधी उमेदवार संजय पाटील यांच्या गटातील असून, मी विशाल पाटील यांचा प्रचार करु नये, मी घरात बसुन रहावे या उद्देशातून गाडीवर हल्ला केला असल्याचा आरोप यावेळी जगताप ‌यांनी केला आहे. त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने गाडीचे उजव्या आरशावर मारुन आरसा फोडून 30 हजार रुपयांचे नुकसान केले आहे, असे तक्रारीत जगताप यांनी म्हटले आहे.पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here