पेड न्यूज व समाज माध्यामांवरील पोस्टचा एमसीएमसी समितीकडून आढावा

0
9

सांगली :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदार संघात येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. या निमित्ताने राजकीय पक्ष व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून निवडणूक प्रचार सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारातील पेड न्यूजवर MCMC समितीमार्फत तर समाज मध्यामांवरील निवडणूक प्रचार पोस्टवर सायबर कक्षामार्फत लक्ष ठेवले जात असून पेड न्यूज व समाज माध्यमांवरील होत असलेल्या प्रचाराचा आढावा आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखालील MCMC समितीने  बैठकीत घेतला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम अधिकारी श्रीनिवास जरंडीकरसूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेलजिल्हा माहिती अधिकारी फारुक बागवानज्येष्ठ पत्रकार अशोक घोरपडे, माहिती अधिकारी एकनाथ पोवार, शंकरराव पवार आदी उपस्थित होते.डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितलेभारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रसार माध्यमांमध्ये होणाऱ्या पेडन्यूजची बारकाईने तपासणी करावी. पेड न्यूज आढळून आल्यास ती तज्ञांच्या समिती पुढे अवलोकनार्थ ठेवावी. तसेच समाज माध्यमांवर MCMC समितीकडून प्रमाणीकरण करून न घेता निवडणूक प्रचार होत असल्यास अशा पोस्टची तपासणी करून खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समावेश करण्यासाठी खर्च विषयक समितीकडे पाठवावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

यापुर्वी दि.25 एप्रिल रोजी MCMC समितीची बैठक पार पडली होती. पेड न्यूज व समाज माध्यामांवरील पोस्टबाबत आढावा घेण्यासाठी समितीच्या नियमित बैठका होतीलअसेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी स्पष्ट केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here