अंकलगीत अवैध धंदे बळावले
माडग्याळ, संकेत टाइम्स : अंकलगी ता.जत येथे अवैध धंदे वाढले असून कोरोना काळातही या धंद्याना उधान आले आहे. पोलीसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
गावात दहा-बारा ठिकाणी बेकायदा देशी,विदेशी दारू विकली जात आहे.त्यामुळे व्यसनाधिनता वाढली असून शाळकरी मुलेही अशा दारूच्या आहारी जात आहेत.गावात सातत्याने वादावादीचे प्रकार घडत आहे.

त्यामुळे गाव अंशात झाले आहे.अनेक जण अशा अड्ड्यावर रात्रन् दिवस धुडाळत आहेत.त्यामुळे गरीब,मजूरांचे घरे उजाड होत आहेत.कमविलेले पैसेही मजूर दारूवर उधळत आहेत.त्यामुळे कुंटुबियांची उपासमार होत आहेत. दारूच्या नशेत घरात भांडणे वाढली आहेत.त्यामुळे पोलीसांनी यात गंभीरपणे लक्ष घालून अवैध धंदे बंद करावेत.
