शेतीशाळा शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल ; आ.विक्रमसिंह सांवत

0जत,संकेत टाइम्स : शेतीशाळा हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे केंद्र आहे.शेतीशाळा शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल, तेव्हा त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन आ. विक्रमसिंह सावंत यांनी केले.तालुक्यातील येळवी येथे कृषि विभाग व आत्मा योजने अंतर्गत महिला शेतकरी यांची मका पिक लागवड व व्यवस्थापन या विषयाची शेतीशाळा श्री वसंतराव पवार यांच्या शेतावर आयोजित करण्यात आली होती.

यावेळी सावंत बोलत होते.कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना हुमणी 

सापळा, दशपर्णी अर्क,5 टक्के निंबोळी अर्क, बीज प्रक्रिया याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच एक गाव एक वाण या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले आहे.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष आप्पाराव बिरादार, मारुती पवार, निलेश बामणे, दिनकर पतंगे, येळवीचे उपसरपंच सुनील अंकलगी, ग्रामपंचायत सदस्य सचिन माने, वसंतराव पवार,कृषी विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, 


Rate Card

उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ, सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी कल्पेश उमराणीकर,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक

रविकिरण पवार, मंडळ कृषि अधिकारी सातपुते, संजय थोरात,कृषि सहाय्यक विठ्ठल राख, बी.एस. गायकवाड, पुजारी, सौ.देवरशी, राजेंद्र डोळळी, श्रीराज भाजीपाला व मोगरा स्वयंसहाय्यता गटातील सर्व सदस्य, दीपक अंकलगी, विक्रांत पवार, सुरज पवार, ओंकार पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालक सागर व्हनमाने यांनी तर, आभार डॉ.रामचंद्र पवार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.