आमदार पी.एन.पाटील अनंतात विलीन,शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी.एन.पाटील (23 मे) अनंतात विलीन झाले.कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली खालसा या मुळ गावी पाटील यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल पाटील यांनी पाटील यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.आमदार पाटील रविवारी राहत्या घरी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर मेंदूत रक्तस्त्राव झाला होता.

 

यानंतर त्यावर कोल्हापूरात उपचार सुरू होते.त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर पण गंभीर होती.मात्र,आमदार पाटील यांची गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूची झुंज अपयशी ठरली.

Rate Card

 

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
राज्य सरकारच्या वतीने उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे,लातूरचे आमदार धीरज देशमुख,सांगलीचे विशाल पाटील देखील उपस्थित होते.आज पहाटे साडे पाचच्या सुमारास पाटील यांची प्राणज्योत मालवली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.