प्रकाश जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त संवाद मेळावा | पालकमंत्री सुरेश खाडे, खा.संजय पाटील, आ. गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती

0
जत : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांचा एक जून रोजी वाढदिवस आहे. जत तालुका भाजप व प्रकाशराव जमदाडे युथ फौंडेशनच्या वतीने वाढदिवसानिमित्त जत येथील राज मल्टीपर्पज हॉलमध्ये अभीष्टचिंतन सोहळा व भाजपा कार्यकर्ता संवाद मिळावा आयोजित केल्याची माहिती भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी, पं.स.चे माजी विरोधी पक्षनेते रवींद्र सावंत, बनाळीचे उपसरपंच अविनाश सावंत, युवा नेते हेमंत चौगुले, योगेश व्हनमाने, अविनाश गडीकर, फौंडेशनचे सचिव विजय रुपनर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. संजय पाटील आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ. गोपीचंद पडळकर, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, बालगाव मठाचे मठाधिपती अमृतानंद स्वामीजी, डॉ. रवींद्र आरळी, नबीलाल मुजावर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

 

या सोहळ्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक महामंत्री मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, सरदार पाटील, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय कांबळे, भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रविपाटील, माजी सभापती आर. के. पाटील, आकाराम मासाळ, प्रभाकर जाधव, सुनील पवार, अविनाश वाघमारे, किसन टेंगले, बंडू डोंबळे, अंकुश हुवाळे, सचिन मदने, मुकेश पवार यांच्यासह भाजप व मित्रपक्षाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हार तुरे नकोत…
नेते प्रकाशराव जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कुणीही हार, तुरे, पुष्पगुच्छ किंवा अन्य काही भेटवस्तू न आणता तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे शालेय वस्तू आणाव्यात, असे आवाहनही प्रकाशराव जमदाडे युथ फौंडेशनचे अध्यक्ष अभय जमदाडे, सचिव विजय रुपनर यांनी केले आहे
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.