पोलीस दलातील संवेदनशील अधिकारी : पंकज पवार

0

 

पोलीस दलात काम करताना संवेदनशीलपणा जपणे खूप अवघड असते. खाकी वर्दी अंगावर आली की काहींचे वागणेच बदलते. अशांचा पोलीस ठाण्यातील ताल काही औरच असतो. सामान्य लोक अशा पोलिसांपासून टरकूनच असतात. अशा तालबाज पोलिसांचे आणि सामान्य जनतेची नाळ कधीच जुळत नाही. असे अधिकारी आले कधी आणि गेले कधी, हे कळतच नाही. मात्र याला अपवाद असलेला अधिकारी म्हणजे तासगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विद्यमान सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार. साहेबांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने हा शब्दप्रपंच…!

पंकज पवार साहेबांनी तासगावचा पदभार स्वीकारल्यानंतर सामान्य जनता केंद्रबिंदू मानून पोलीस ठाण्यात काम केलं. आलेल्या प्रत्येकाच्या तक्रारींचे निरसन करणे, त्यांना न्याय देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. वरिष्ठ अधिकारी रजेवर असले की साहेबांकडेच पोलीस ठाण्याची जबाबदारी असायची. वरिष्ठांच्या गैरहजेरीत अत्यंत जबाबदारीने ते पोलीस ठाणे सांभाळताना दिसले.

अनेकवेळा पोलिसांच्या बाबतीत सामान्य जनतेला फारसा चांगला अनुभव येत नाही. पंकज पवार यांच्याबाबतीत मात्र तसे झाले नाही. अत्यंत संवेदनशील, अभ्यासू, तपासकामात ‘नेटवर्क’च्या जोरावर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे कसब साहेबांकडे आहे. तासगावात त्यांची आणि पत्रकारांची चांगली मैत्री झाली होती.

रात्री – अपरात्री जरी एखादे काम सांगितले तरी वेळकाळ न बघता साहेबांची ते काम करण्यासाठी धडपड सुरू असते. साहेब तासगावात असताना घरी जेवणासाठी निम्म्या रस्त्यात गेले होते. मात्र एका फोनवर परत पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी नागरिकांची तक्रार ऐकून घेतली. इतरवेळी एखादी तक्रार दाखल करताना तक्रारदाराला दिवसदिवस पोलीस ठाण्यात थांबावे लागते. मात्र, पंकज पवार हे अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्त्व असल्याने ते तातडीने लोकांची दखल घेतात. गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या साहेबांनी काही वर्षात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशी त्यांची ख्याती आहे.

Rate Card

साहेब सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत. तासगावातून जत तालुक्यातील उमदी येथे त्यांची बदली झाली होती. त्याठिकाणी पोलीस ठाण्याचे ते ‘इनचार्ज’ होते. उमदी पोलीस स्टेशन हे जत तालुक्यातील शिवेवर असणारे पोलीस ठाणे. पुढे गेलं की कर्नाटक राज्य सुरू होते. त्या भागात क्राईम रेट जास्त होता.

मात्र साहेबांनी उमदीचा पदभार हातात घेतल्यानंतर तेथील क्राईम रेट कमी करण्याचा प्रयत्न केला. तेथील सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. उमदी येथून त्यांची बदली सांगली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे झाली. त्याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून ते अतिशन उत्कृष्टपणे काम करीत आहेत. अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास त्यांच्या टीमने लावला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गुन्हे अन्वेषण’ची टीम अतिशय चांगले काम करीत आहे.आज साहेबांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा🌹🌹🍇🍇

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.