बोगस बियाणे,खते विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करा | – विकास साबळे

0
जत : जत‌ तालुक्यात खरीपाची पेरणीची शेतकऱ्यांकडून तयारी सुरू असून त्यांना बोगस बियाणे,खते,जादा दराने विकून लुबाडणारी काही दुकानदारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत.अशा शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या दुकानदारावर कृषी विभागाने कारवाई करावी,अशी मागणी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.
साबळे पुढे म्हणाले,महाराष्ट्रातील विस्ताराने सर्वात मोठा असणारा जत तालुका हा कायम दुष्काळी असून गतवर्षी खरीप व रब्बी पिकाची पेरणी पुरेशा प्रमाणात झाली नाही.पाऊस कमी झाल्यामुळे पेरणी करुन सुद्धा कोण आले नाही जे उगवले ते पाण्यामुळे जळून गेले.त्यामुळे बळीराजा मोठ्यात संकटात सापडला होता.मागील काही दिवसापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू होते.

जनावरांचा चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न तालुक्याच्या पुढे उभा राहिला होता,परंतु गेली चार दिवस झाले पावसाने बऱ्यापैकी सुरुवात केल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदी झाला आहे.पेरणीपूर्व मशागतीस सुरुवात झाली आहे.जत तालुक्यामध्ये ७८ हजार हेक्टर क्षेत्र खरीप पेरणी योग्य असून त्यापैंकी साधारणपणे ३८ हजार हेक्टर क्षेत्र हे बाजरी या पिकाची पेरणी केली जाते तर मका,भुईमूग,सूर्यफूल,उडीद, मटकी,हुलगा अशा प्रकारचे कडधान्य पिक याच हंगामामध्ये येत असतात. त्यामुळे पावसाने सुरुवात केल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.पावसाने सुरुवात केल्यामुळे या खरीप हंगामात तर पेरणी होऊन आपल्याला आपल्याला  वर्षभर लागणारे अन्नधान्य व कडधान्य येण्याचे आशेवर शेतकरी वर्ग हा कृषी दुकानदाराकडे बियाणे,खते खरेदीसाठी जात आहे. या गोरगरीब शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात लुटण्याचे काम तालुक्यातील काही दुकानदार करीत आहेत.बऱ्याच शेतकऱ्यांना बी बियाणे घेतलेली पावती दिली जात नाही.दिलेली पावती ही कच्ची असते.

 

Rate Card
बियाणे निकृष्ट पद्धतीचे व बोगस बियाणे विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे.याकडे कृषी विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असून कृषी विभाग व कृषी दुकानदार यांचे संगनमत असल्याचा आरोप विकास साबळे यांनी केला आहे.ग्रामीण भागातील कृषी दुकाने तर वाढीव दराने बियाणे खते विक्रीवर भर देत आहेत.शेतकऱ्यांच्या मानगुटी बोगस व खोटी बियाणे जादा दराने मारली जात आहे.याकडे ताबडतोब कृषी विभागाने लक्ष देऊन योग्य दरात शेतकरी वर्गांना बियाणे व खते मिळतील याची दक्षता घ्यावी.बोगस खते विकणारे व बी बियाणे औषध विकणारे दुकानदारावर अंकुश ठेवून कारवाई करावी,अन्यथा शेतकऱ्यांच्या बाजूने रिपब्लिकन पार्टी इंडिया तीव्र प्रमाणात आंदोलन करेल,असा इशारा साबळे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.