अतिग्रे : संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीने यावर्षीच्या नीट परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. हर्षवर्धन देशमुख या विद्यार्थ्यांने 720 पैकी 715 गुण प्राप्त करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.तसेच धीर मेहता, सुधांशु खवरे, प्रतीक रामतीर्थकर , सत्यजित जगताप व संकेत सजागणे यांनी ७०५ गुण मिळवून ऐतिहासिक निकालाची परंपरा कायम राखली.
मोहंमददारिज पुणेकर व ईशान जोशी यांनी अनुक्रमे ७०१ व ७०० असे गुण मिळवले. संस्थेच्या एकूण ८ विद्यार्थ्यांनी ७०० पेक्षा अधिक गुण मिळवले .सर्व विद्यार्थ्यांना संचालक श्री वासू सर व प्रिन्सीपल श्री गुप्ता सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल बोलताना वासू सर म्हणाले, नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व अविरत कष्टाची जोड असेल तर कोणत्याही चांगले यश संपादन करता येते. जेवढे मोठे स्वप्न असेल, तितकाच मोठा संघर्ष असेल, आणि जेवढा मोठा संघर्ष असेल,
तितकेच मोठे यश असेल असेही ते म्हणाले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी , शिक्षक , पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.