प्रा.राजेंद्र कोळेकर सरांचे निर्णायक वळणांची स्थित्यंराची तेजस्वी कहाणी आहे.कर्तृत्वाच्या गगनात स्वच्छंदरित्या विहार करणारे कोळेकर सर आपल्या अंगबळावर समाजविकास कार्याचा व रचनात्मक परिवर्तनाचा रथ काही योजनेपुढे ओढून नेऊ पाहतायेत.आयुुष्यातील प्रत्येक पाऊल हे टाकताना आव्हान वाटते. मात्र आव्हानाला बुध्दिमतेची आणि आत्मविश्वासाची जोड दिली की प्रत्येक आव्हानावर मात करणे कठीण नसते. हे कर्तृत्वातून आणि नेतृत्वातून शिकायला मिळते हे राजेंद्र कोळेकर सरांच्या कर्तृत्वा वरून सिध्द होते.
कर्तृत्वदक्ष प्रशासक संयमी वक्तृत्व,नितीसंपन्न ग्रहस्थ व मातृपितृ भक्त पुत्र हे कोळेकर सरांच्या व्यक्तिमहत्वाचे काही ठळक पैलू आहेत.आपली बुध्दिमता,कार्यक्षमता,व नितीमता यावर अढळ विश्वास असणाऱ्या कोळेकर सरांना जत तालुक्यातील नागरिकांच्या जीवनात बद्दल घडवायचा आहे.त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी त्यांची तळमळ त्यांना गप्प बसवत नसल्यानचे त्यांनी जत विधानसभा लढविण़्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या तालुक्यातील संवाद बैठकांना मिळत असलेला प्रतिसाद त्यांचा विजय निश्चित असल्याची प्रचिती देत आहे.
आपल्या तालुक्याचा विकास व्हायचा झाल्यास शासनाचा जास्तीत जास्त निधी आणून तो योग्य ठिकाणीच खर्च होईल याचा पाठपुरावा केला पाहिजे. आपल्या तालुक्याला दुष्काळाचा लागलेला कलंक हा नाहिसा झाला पाहिजे. तालुक्यातील हजारो बेरोजगार युवकांना उद्योग उभारून त्यासाठी कर्जपुरवठा उपलब्ध करण्याचा संकल्प घेऊन कोळेकर सर जतच्या राजकारणात उतरले आहेत. तालुक्यातील पूर्व भागातील गावा पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने तो सोडविण्यासाठी शासन दरबारी जनतेच्या पाठिंब्यावर पूर्णपणे ताकद लावून तो कायमस्वरूपी सोडविण्यासाठीच मी आगामी विधानसभेची निवडणूक जनतेच्या पाठिंब्यावर मोठ्या ताकदीनिशी लढविणार असल्याची माहिती जत तालुक्याचे प्रसिध्द उद्योगपती प्रा. राजेंद्र कोळेकर सर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना स्पष्ट केले आहे.
प्रत्येक निवडणुकीत लोकप्रतिनिधीकडून शेतीच्या पाण्यावरून राजकारण सुरू आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून मी पाहतोय, जत पूर्व भागातील लोकांनी पाणी द्या नाही तर कर्नाटकात जाण्याचा निर्वाणीचा इशारा शासनास दिल्याने शासनास जाग आली.जनरेटा वाढल्यानंतर सरकारने म्हैसाळ विस्तारित योजनेचा पहिला टप्पा पूर्ण होत असताना दुसरा मंजूर केला पण तो कधी पूर्ण होतोय याकडे जनतेचे लक्ष आहे.
पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे.तालुक्यातील सर्वच गावांना वाडया, वस्त्यावरती पाणी ळिण्यासाठी माझे पहिले कार्य व प्राधान्य असणार आहे. राज्यात काही ठिकाणी प्रादेशिक योजना पूर्ण होवून प्रत्येक गावात पाणी उपलब्ध झाले पण तालुक्यात एकही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नसल्याने जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे लागते. अचलपूर तालुक्यात आ. बच्चू कडू व सांगोला तालुक्यात स्व. गणपतराव देशमुख यांनी पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या आहेत त्याच धर्तीवर जत तालुक्यात मी अशा योजनेसाठी प्रयत्न करून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार आहे. यावर्षी उन्हाळ्यात पूर्व भागातील जनतेसाठी २०० पिण्याच्या पाण्याचे टाकीचे वाटप करून मी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
जत तालुक्यात विजेचा प्रश्नही मोठा बिकट बनला असून तालुक्यात पवनचक्कीचे जाळे असून विजेचा तुटवडा का जाणवतो आहे ? लोडशेडींगमुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली असून विजेअभावी शेतकऱ्यांची पिके जळून जात असून ही दुर्दैवी अवस्था आहे.याकडे काणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष दिसून येत नाही.तालुक्यातील रस्त्याची अवस्था तर अतिशय बिकट आहे.अनेक गावात नागरिकांना व शेतकऱ्यांना दोन ते तीन कि. मी.पायी चालत जावे लागते. या तालुक्यातील रस्त्याच्या प्रश्नासाठी मी लक्ष घालून ते सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी व नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत विकासाचे,आश्वासनांचे गाजर दाखवून आपला फायदा करून घेतला आहे. तालुक्यातील ३० हजार मजूर दरवर्षी ऊस तोडीसाठी हातात कोयता घेवून अन्य तालुक्यातील कारखान्याकडे जातात. मात्र याकडे कोणत्या लोकप्रतिनिधीचे लक्ष आहे काय ? केवळ निवडणुकीसाठी त्यांचा वापर करून घेतला असून त्यासाठी एक आदर्शवत कार्यक्रम हाती घेवून त्यांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
गेल्या दोन महिन्यापासून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तालुक्याचे दैवत खलाटी येथील श्री लक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेऊन तालुक्यातील जनसंपर्क दौऱ्याचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले होते. तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. सर्वच गावात आमचे भव्य स्वागत करण्यात आले आणि या भेटीदरम्यान सर्व गावातील प्रश्नांची माहिती, लोकांच्या अडचणी, समस्या व मागण्या समजावून घेतल्या. त्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्या दौऱ्यादरम्यान युवक वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने युवकांचे संघटन करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.
या दौऱ्याचे वेळी ओ. बी. सी. नेते शंकर वगरेसर, नागनाथ मोटे, दिलीप बिराजदार, हिंदुराव शेंडगे, राजू दुधाळ, दिनेश शेळके, योगेश पाटील, लकी पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.एकूणच तालुक्यातील संपूर्ण गावांचा संपर्क दौऱ्यानंतर जनतेची मिळालेली सहानुभूती, मोठा पाठिंबा व प्रतिसाद पाहता माझे मनोधैर्य वाढले असून माझा आत्मविश्वासही वाढला आहे. तालुक्यातील जनताच साहेब कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवाच असा आग्रह धरत आहे. सर्वतोपरी मदत करून कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपल्याला निवडणूक आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याने जनतेच्या आशिर्वादाने व त्यांच्या पाठिंब्यावर आगामी निवडणूक मी जत तालुक्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून मोठ्या ताकदीने लढविणार हे निश्चित आहे.
मला निवडणूक जिंकायची आहे !
• जत तालुक्याचे विभाजन व पूर्व भागातील पिण्याचा,शेतीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी
• दुर्लक्षित राहिलेल्या पालातील (झोपडपट्टीतील) दुर्लक्षित लोकांच्या विकासासाठी
• शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू फुलविण्यासाठी
• बेरोजगार युवकांना उद्योगधंद्यात गुंतवण्यासाठी
• तालुक्यातील जनतेला कोर्ट केसीस, पोलीस स्टेशन केसीस व गुन्हेगारीतून मुक्त करणेसाठी
• महिलांना सन्मानाने स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी
• शिक्षकाचे उत्तरदायित्व समाजाला देण्यासाठी
• शेतकऱ्यांचे विज,पाणी,विमासह अनेक प्रश्न सोडविण्यासाठी
• पशुपालकांना योग्य दुधदर मिळवून देण्यासाठी
• तालुक्यातील प्रत्येक गाव,वाड्यावस्त्या पक्क्या डांबरी रोडने जोडण्यासाठी
• प्रत्येक गावागावात विकास कामे आणून गावे समृध्द करण्यासाठी