डफळापूर : डफळापूर येथील सर्व सेवा सह.सोसायटीचे माजी चेअरमन हुसेन आत्तार यांचे आज सकाळी निधन झाले.डफळापूर येथील मनमिळावू,सर्वांना सामावून घेणारे चाचा म्हणून हुसेन चाच्याची ओळख आहे.डफळापूरच्या राजकारणात त्यांनी प्रभावशाली काम केले आहे.डफळापूर सोसायटीचे चेअरमन म्हणून त्याचे मोठे योगदान आहे.सामान्य लोकात सामावून त्यांचे प्रश्न समजून घेणे,त्यांना प्रत्येक अडचणीत आधार देण्यात हुसेन चाचा कायम अग्रस्थानी असायचे.
अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे असतानाही त्यांनी डफळापूर सारख्या संस्थानिक गावात राजकीय,सामाजिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे.रविवार सकाळी त्यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला.तात्काळ त्यांना उपचार्थ हलविण्यात आले.मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली.जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब यांचे अत्यंत विश्वासू म्हणूनही हुसेन चाचा यांची वेगळी ओळख होती.