जत तालक्यात भूमिपुत्र जवानांचा होणार सन्मान सोहळा | प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम  

0
जत : देश हितासाठी जीवाची तमा न बाळगता लढलेले भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त, तसेच कर्तव्य करीत असलेले जवान, स्वातंत्र्यवीर, युद्धभूमीतील रियल हिरो व त्यांच्या कुटुंबीयांचा यथोचित गौरव व सन्मान सोहळा 9 ऑगस्ट या क्रांती दिनानिमित्त आयोजित केला आहे.जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या संकल्पनेतून व सामाजिक कर्तव्य भावनेतून हा सोहळा समस्त जत तालुक्याच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हा सोहळा जतमधील छत्रीबाग रोड,राज इव्हेंट हॉल येथे आयोजित केला जाणार असल्याची माहिती प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.या सोहळ्यास जिल्हा पोलिस प्रमुख संदिप घुगे,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल डॉ.भिमसेन केशव चवदार,उपविभागीय पोलीस हिंदकेसरी सुनिल साळुंखे,उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे,पोलीस निरिक्षक सुरज बिजली,माजी सैनिक वेलफेअर असो जतचे अध्यक्ष कँप्टन बबनराव कोळी,गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर,माजी सैनिक वेलफेअरचे उपाध्यक्ष सिध्दू गायकवाड आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

 

ऑगस्ट हा क्रांतीचा महिना म्हणून ओळखला जातो.दीडशे वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यात असणाऱ्या भारतात १९४२ साली स्वतंत्र भारताची मशाल पेटली आणि १५ ऑगस्ट १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपण देशाचा अमृतमहोत्सव देखील अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला.खरेतर देशाच्या जडण घडणीमध्ये ज्या सर्वच घटकांचा मोठा वाटा आहे.त्यापेक्षा कितीतरी मोठा आणि स्वाभिमान वाटावा असा सहभाग आपल्या जवानांचा, स्वातंत्र्यवीरांचा राहिला आहे. अखंड भारताच्या स्वातंत्र्या नंतर देखील येथील सीमा सुरक्षित आणि देश वासियांची आण, बाण, शान राखण्याचे काम खऱ्या अर्थाने कुणी केली असेल तर सैन्य दलातील जवानांनी! म्हणूनच समाजात  नेहमीच आदराचे आणि सन्मानाचे स्थान राहिलेले आहे.प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशन देखील याच विचाराने गेली पाच वर्षे जत तालुक्याच्या विकासात्मक रचनेमध्ये आघाडीची आणि लोकभावना व जनहित जपणारी संस्था म्हणून  काम करत आहे.

 

Rate Card
आपल्या दुष्काळी जत तालुक्याच्या विकासात असे योगदान देणारे विविध विभागातील, घटकातील लोकांचा सन्मान करणे, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे, हा आमच्या फाउंडेशनचा प्रमुख ‘अजेंडा’ राहिला आहे.त्याच भूमिकेतून क्रांती दिनाचे औचित्य साधत देश हितासाठी जीवाची तमा न बाळगता लढलेले आजी माजी जवान, स्वातंत्र्यवीर, युद्धभूमीतील रियल हिरो व त्यांच्या कुटुंबीयांचा यथोचित गौरव व सन्मान म्हणूनच तालुक्यासाठी जितका स्फूर्तीदायी तितकाच प्रेरणादायी असणाऱ्या या सोहळ्यास  उपस्थित राहून, आमच्यातील देशप्रेमाची प्रेरणा आणखीन वाढण्यास बळ देऊन नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशराव जमदाडे युथ फॉउंडेशनचे अध्यक्ष अभय जमदाडे, उपाध्यक्ष औदूंबर पोतदार,सचिव विजय रुपनूर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.