जत,संकेत टाइम्स : हिवरे ता.जत येथील आंनदा नामदेव शिंदे (वय 55)यांचा संशयास्पद मुत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत जत पोलीसात मुत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, मयत आंनदा शिंदे यांचा मृत अवस्थेत त्यांचा मुलगा समाधान शिंदे यांनी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता.
रुग्णालयाचे डॉ.इरकर यांनी जत पोलीसात वर्दी दिली आहे.दरम्यान आंनदा शिंदे यांचा मुत्यू कशामुळे झाला हे निश्चित समजू शकले नाही.
दरम्यान शिंदे कुंटुबियांनी बारा दिवसापुर्वी झालेल्या वादातून आंनदा शिंदे यांचा मुत्यू झाल्याचा आरोप केला असून त्या अंतर्गत पोलीसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.






