दोन महिन्यापासून डंपरचा शोध नाही

0



जत,संकेत टाइम्स : जत शहरातून चोरीला गेलेल्या डंपरचा दोन महिन्यानंतरही शोध‌ लावण्यात जत पोलीस अपयशी ठरले आहेत.

जत शहरातील रहिवाशी भागातून माडग्याळ येथील अमोल विलास चव्हाण यांच्या मालकीचा अशोक लेलड कपंनीचा डंपर (क्र.एमएच 10,सीआर 1582) हा ता.25 मार्च रोजी घरासमोर लावलेला असताना मध्यरात्री चोरट्यांनी पळवून नेहला आहे. घटनेची ता.26 मार्चला जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.






मात्र तब्बल दोन महिन्याचा कालावधी लोटला तरीही अद्याप डंपरचा शोध लागलेला नाही.विशेष म्हणजे शहरातील रहिवाशी भागातून पळविलेला डंपरचा सीसीटिव्हीच्या माध्यमातून तपास लावण्याची गरज आहे. मात्र तपास अधिकाऱ्यांची मानसिकता तशी दिसत नसल्याचे समोर येत आहे.

जवळपास 20 लाख रुपयाचा भला मोठा‌ डंपर चोरटे लांबवित असतील तर शहरातील अन्य‌ छोटी वाहने कशी सुरक्षित‌ राहू शकतील असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.



Rate Card




दरम्यान डंपर मालक अमोल चव्हाण व काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्नाटक,महाराष्ट्रातील अनेक भागात डंपरचा शोध केला आहे. मात्र अद्याप डंपरचा थागपंत्ता लागलेला नाही.

तातडीने शोध‌ लावावा अन्यथा नाईलाजस्तव आंदोलन करावे लागेल,असा इशाराही ‌अमोल चव्हाण यांनी दिला आहे.



जत शहरातून चोरीला गेलेला ट्रॉक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.