सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे महाविकास आघाडीचा ५ संप्टेबरला मेळावा होणार असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे.या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांनी हा मेळाव्याचे आयोजन केले असून तयारी सुरू झाली आहे.महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना डॉ. विश्वजित कदम यांनी निमंत्रण दिले आहे.बहुतांशी नेत्यांनी येण्याची तयारी दर्शविली आहे.भव्य रँलीचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे.महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेना यांची एकजूट मेळाव्याच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली.