बदलापूरसारखी घटना घडण्याअगोदर सतर्कता बाळगण्याची गरज

0
12

जत : बदलापूरसारख्या घटना घडू नयेत  यासाठी जत पोलीसांच्या निर्भया पथकाने कठोर भूमिका घेत आक्रमक होण्याची गरज असल्याचे मत पालकांतून ‌व्यक्त होत आहे.
जत शहरातील विविध शाळा,हायस्कूल,महाविद्यालय व कोचींग क्लासेस परिसरात मोठ्या प्रमाणात रोडरोमिओंचे कळप शाळा,हायस्कूल,महाविद्यालय व कोचींग क्लासेस भरतेवेळी व सुटतेवेळी मोटार सायकलवरून फिरत असतात.हे रोडरोमिओ मुलींच्या मागे मागे जाणे, त्यांना टोमणे मारणे,त्यांच्या पाठीमागून व पुढून मुद्दाम मोटार सायकलवरून फिरणे.अशा प्रकारे त्रास देताना दिसत आहेत.बहुतांशी रोडरोमिओ हे अल्पवयीन आहेत.वाहन परवाना नसतो,शाळकरी मुलींच्या बाजूने दुचाकीवरून भरधाव जाताना दिसत आहेत.यापैकी बहुतेक सडकछाप तरूण हे राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मर्जीतील लोकांची मुले असल्याने त्यांच्यावर जर पोलीसांनी कारवाई केलीतर हेच राजकिय पक्षातील नेतेमंडळी,पदाधिकारी व कार्यकर्ते हे पोलीसांनाच या सडकछाप तरूणांवर कारवाई न करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करताना दिसत आहेत.

 

मोटार सायकलवरून भरधाव वेगात मुलींच्या पुढून व मागून वाहने चालविणा-या या सडकछाप तरूंणांकडे धोकादायक हत्यारेही आहेत.जर कोणी यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केल्यास ते आपल्या जवळील घातक हत्यारे दाखवून प्रतिबंध करणाऱ्यास गप्प करतात.त्यामुळे त्यांच्याविषयी कोणी तक्रार करीत नाहीत.
या सडकछाप युवकांना मादक पदार्थांचे व्यसन आहे. त्यासाठी ते वाट्टेल त्या मार्गाचा वापर करून आपले नसेचे व्यसन पूर्ण करून घेत आहेत. त्यासाठी त्यांना भूरट्या चो-याही कराव्या लागत आहेत. अशा या समाजाला किड लागलेल्या सडकछाप मजनूंचा जत पोलीसांनी पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चांगलाच पाहुणचार करावा.या दरम्यान कोणी राजकीय पक्षातील नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यास अशा नेतेमंडळींच्यावरही कारवाई करावी व जत शहरातील शाळा,हायस्कूल, महाविद्यालय व कोचींग क्लासेस मधिल महिलांना सुरक्षा कवच द्यावे अशी अपेक्षा बदलापूर येथील झालेल्या घटनेनंतर पालकवर्गातून व्यक्त होत आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here