कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या उपचारासाठीसाधनसामुग्री, औषधसाठा सज्ज ठेवण्याचे आदेश

0



सांगली : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. त्यामुळे लहान बालकांसंबधीची आवश्यक माहिती आतापासूनच तयार करण्यात यावी. लहान मुलांच्या उपचरासाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी 10 निव्होनेटर व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया राबवावी. लहान मुलांना कोविड नंतर MISC चा धोका अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे या संबंधिची औषधेही उपलब्ध करुन ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी.  असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.






जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना सध्यस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट 11 टक्क्यापर्यंत खाली आला आहे. हे दिलासादायक चित्र असून हा कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट आणखी खाली आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रयत्नशिल रहावे. असे आदेशित करुन पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, कोरोना रुग्ण्‍ा संख्या आटोक्यात येत आहे. त्याचप्रमाणे म्युकरमायकोसिस रुग्ण संख्या अटोक्यात राहण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट कमी आल्यामुळे दिवसाला 53 मेट्रीक टन इतकी ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. ती आता कमी होऊन 34 मेट्रीक टनापर्यंत खाली आली आहे. तसेच जिल्ह्यात सुमारे 1500 रुग्ण व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

Rate Card

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिलासादायक जरी असली तरीही राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. यामध्ये येत्या काळात सुधारणा होऊन वरील टप्प्यात जाण्यासाठी जिल्हाप्रशासनाने प्रयत्नशिल रहावे. असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात जानेवारी ते आतापर्यंत सुमारे 5 लाख 16 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. सध्यस्थितीत दिवसाला 7 ते 8 हजार कोरोना चाचण्या होत आहेत. या चाचण्यांचेही प्रमाण वाढविण्यात यावे. कोरोनाचा कहर काही अंशी कमी आला असला तरी जनतेने मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन आतापर्यंत जसे सहकार्य केले तसे सहकार्य या पुढील काळातही करावे. कोणत्याही प्रकारचे लक्षणे जाणवल्यास अंगावर न काढता तातडीने कोरोना टेस्ट करुन घ्यावी. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.






जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात सध्यस्थितीत कोरोनाबाबत सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन जिल्ह्यात सुरु असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनूसार प्रतिबंधात्मक आदेशाच्या अंमलबाजावणीबाबतची   सविस्तर माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हापरिषदेच्या माध्यमातून ग्रामीणस्तरावर सुरु असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देऊन कोरोना सध्यस्थितीत सुरु असलेल्या कामकाजाचे सादरीकरण यावेळी केले.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.