तासगाव तालुका खरीप हंगामासाठी सज्ज | जत तालुक्यात कृषी विभाग मात्र अद्याप ढिम्मच

0तासगाव : तासगाव तालुक्यात यावर्षी पूर्व मान्सून पाऊस चांगला झाल्यामुळे खरिपाच्या मशागतींना वेग आला आहे. सद्यस्थितीला तालुका खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर यांनी दिली. तालुक्यात अंदाजे 35126 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.


    
ते म्हणाले, तालुक्यात जून महीन्यात सरासरी 114 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत 37 मिलीमीटर म्हणजे 32 टक्के पाऊस झाला आहे. तालुक्याचे खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र 35126 हेक्टर आहे. यामध्ये प्रामुख्याने  खरीप ज्वारी 18600, सोयाबीन 5000, मका 3500, भुइमुग 3500, मूग – उडीद 1600, तूर 1200 इत्यादी पिकाचे पेरणी नियोजन केले आहे. त्यासाठी लागणारे बि – बियाणे, खते उपलब्ध झाली आहेत. 


      
ते म्हणाले, तालुक्यातील शेतकरी बंधूनी किमान 70 मिलीमीटरच्या पुढे पाऊस झाल्यावर वापसा पाहुनच पेरणी सुरुवात करावी. पेरणीपूर्वी सोयाबीन बियाणाची घरच्या घरी उगवण क्षमता तपासून घ्यावी. किमान 70 टक्केपेक्षा जास्त उगवण झाल्यास ते बियाणे पेरणीसाठी योग्य आहे, असे समजावे. त्याचप्रमाणे पेरणीपूर्वी बियाणास रासायनिक व जैविक औषधांची बीज प्रक्रिया करावी. पेरणीबरोबर रासायनिक खतसुद्धा शिफारशीनुसार पेरावे.

 


Rate Card
कृषि विभागाचेे खरीप हंगामाचे नियोजन…!* 

 

     सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिके 300, हुमणी कीड नियंत्रण प्रात्यक्षिके 450, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिके 360, जमीन सुपिकता निर्देशक आधारे रासायनिक खत वापर व 10 टक्के खत बचत मोहिम 680, क्रॉप्स संलग्न शेतीशाळा 38, प्रात्यक्षिक प्रकल्प मका – सोयाबीन 90 हे, मिनी किट 55 क्विंटल, मग्रारोहयो फळबागलागवड 360 हे. 


      

तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रात किमान 70 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. अपुऱ्या ओलावामुळे  उगवणीवर परिणाम होऊन पेरणी वाया जाऊ शकते. त्यामूळे पुरेसा ओलावा झाल्यावरच पेरणी करावी. खरीप हंगामासाठी आवश्यक बि – बियाणे, खते अधिकृत परवाना धारक विक्रेत्याकडून पावती घेऊन खरेदी करावे, असे आवाहन अमृतसागर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.