तुम्हाला फवारणी पंप हवाय ? | तातडीनं करा आजच अर्ज

0
18

सोलापूर : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाकळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्याकरिता २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.

 

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांत राबविण्यात येत आहे.

 

सन २०२४-२५ मध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी सोयाबीन या पिकाकरिता सदर योजना लक्ष्यांक प्राप्त आहे. महाडीबीटी पोर्टलवर ३० जुलै २०२४ पासून सदर बाबीच्या टाइल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत व महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरिता २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरण या टाइलअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज करावेत. व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here