जळगाव : महाराष्ट्रसह देशभरातील महिलांवरील अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई कायदा आणणार असून यापुढे असे प्रकार कदापि खपवून घेणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे स्पष्ट करत पोलीसात एफआयआर दाखल करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता आता महिलांना घरातूनच ई-एफआयआर दाखल करता येईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आश्वस्त केले.
जळगाव येथील लखपती दीदी सन्मान सोहळ्यात पंतप्रधान मोदी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.न्यायसंहितेच्या माध्यमातून यापुढे कठोर कायदे करण्यात येणार आहे.