कोल्हापुरातील युवतीवर लग्नाच्या आमिषाने सांगलीत अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल

0
19

सांगली : एका युवतीस लग्नाचे आमिष दाखवून सांगलीत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घ़डला आहे.पिडित युवती कोल्हापूरात शासकीय सेवेत आहे.दरम्यान अत्याचार करणारा आणि आणखीन एकजण अशा दोघांवर बलात्कार आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचर प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन संभाजी गायकवाड (वय २५, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि अमोल कुरणे (रा. कुंडलवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. मार्च ते जून २०२४ या कालावधीत हा प्रकार सांगलीत घडला. पीडित युवती कोल्हापूरची आहे. संशयित गायकवाड याने तिच्यासमवेत लग्न करतो असे आमिष दाखवून जवळीकता वाढविली.
विश्वास संपादन करत तिला सांगलीतील १०० फुटी रस्ता परिसरातील एका बिल्डिंगमध्ये वारंवार नेले. तेथे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता लग्नाला नकार दिला.जातीवाचक उल्लेख केला.

 

त्यानंतर पिडितेने संशयित सचिनच्या नातेवाईकाशी संपर्क केला.त्यावेळी सचिन तुझ्यासोबत लग्न करणार नाही,असे अमोल कुरणे यांनी सांगत त्या बदल्यात एक लाख रुपये देतो असे सांगितले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here