आरपीआयवर अन्याय; हव्यात १२ जागा

0
12

पुणे : महाराष्ट्र आमचा बालेकिल्ला आहे. मित्रपक्ष एवढ्या जागा लढताहेत त्या निवडून येणार नाहीत. म्हणून आमच्या पक्षाचा विचार होणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा केला जातो, ही कार्यकत्यांची भावना आहे. शरद पवारांच्या काळात आम्हाला विधान परिषदेच्या सात जागा मिळाल्या होत्या. पण भाजप आणि शिवसेनेत आल्यावर एकही जागा मिळाली नाही. आता विधानसभेच्या १२ जागा मिळाव्यात, सोबत दोन मंत्रिपदे मिळावीत अशी आमची मागणी असून मित्रपक्षांनी त्याचा विचार करायला हवा, अशी खदखद केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

 

ते पुण्यात बालगंधर्व येथे कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी पत्रकारांशी बोलत होते. भाजपमध्ये आमच्या पक्षावर अन्याय होतो असे दिसत आहे. लोकसभेमध्ये आम्हाला दोन जागा द्याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. त्या दोन जागा निवडून आल्या असत्या आणि राज्यात आमच्या पक्षाला मान्यता मिळाली असती. मणिपूर, नागालँडमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली. ते म्हणाले, नोव्हेंबरच्या अखेर निवडणुका होतील. २८८ पैकी दहा, बारा जागा आरपीआय पक्षाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, नाशिक अशा अनेक शहरांमध्ये आरपीआयच्या शाखा आहेत. आरपीआयमध्ये कितीही गट असले तरी माझा गट हा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. जवळ- जवळ १८० ते २०० जागा आमच्या निवडून येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. महिला अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

 

 

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here