कोल्हापूर : जिल्ह्यातील कोनवडे येथे एकतर्फी प्रेमातून प्रेयसीचे वशिकरण करण्यासाठी चक्क स्मशानभूमीत करणी चेटूकचे प्रकार केल्याचे उघड झाले. चार दिवसांपूर्वी गावातील एकाचा मृत्यू झाल्यानंतर जाणती मंडळी व तरुण चिता रचण्यासाठी स्मशानभूमीत गेले होते. त्यावेळी साफसफाई करताना हा प्रकार समोर आला.
लिंबूवर कागद गुंडाळून त्यावर खिळा मारलेला होता. तसेच गुलाल टाकलेले निदर्शनास आले. कुतूहलापोटी तरुणाने पुढे होत लिंबूवरील कागद काढला असता त्यावर ‘माझ्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी… (मुलीचे नाव) मला मिळावी’ असा लिहिलेला मजकूर वाचण्यास मिळाला.