एका अल्पवयीन मुलीवर ओळखीचा फायदा घेत दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.पिडित मुलीचा गर्भपातही केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.याप्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. तर गुन्हा दाखल असलेला दुसरा एकजण अल्पवयीन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.मंगळवारी याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने एका आरोपीला अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पीडित मुलगी तालुक्यातील एका गावात राहते.संबंधित मुलीवर एका अल्पवयीन मुलासह अन्य एका युवकाने वारंवार अत्याचार केला.मुलीच्या घरी जाऊन त्यांनी हे कृत्य केले.वारंवार झालेल्या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली. त्यानंतर एका संशयीताने तिला औषध देऊन तिचा गर्भपात केला.
याप्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाला आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलासह विनोद काटकर नामक युवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.त्यापैकी विनोद काटकर याला पहाटेच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.