वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे.) येथील तलाठी कार्यालयात शेतीविषयक कागदपत्रासाठी आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. २८) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. जखमी तलाठ्याचा परभणी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
तलाठी संतोष देवराव पवार (३६, रा. वाढोणा, ता. सेनगाव) हे बुधवारी दुपारी आडगाव (रंजे.) येथील कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज करत होते. त्यांच्याकडे एकजण शेतीविषयक कामकाजासंदर्भात तिथे आला. या ठिकाणी दोघांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाली. त्याने तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चाकूने भोसकले.