300 किलोमीटरची पदयात्रेमुळेे स्वाभिमाने उर भरून आला | जनतेपर्यत पोहलेले तम्मणगौडा रवीपाटील बनले लोकप्रिय नेते

0
4
जत : जत तालुका आजही दुष्काळाशी दोन हात करत आहे. जतकर म्हैसाळच्या पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. हाताला काम नाही, शेतीमालाला भाव नाही. जतकरांच्या व्यथा त्यांच्या थेट गावात, बांधावर जावून जाणून घेण्यासाठी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तथा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा समितीचे केंद्रीय समितीचे सदस्य तम्मणगौडा रवीपाटील यांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये जनकल्याण संवाद पदयात्रा काढली. तीन टप्यात निघालेल्या ३०० किलोमीटरच्या या पदयात्रेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसरा व अखेरचा टप्पा गुरुवारपासून सुरु होतोय.
रवीपाटील यांनी काढलेल्या या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उमदीपासून पद‌यात्रेला सुरुवात झाली. जत पूर्व भाग, बिळूरसह दक्षिण भाग डफळापूरसह पश्चिम भागानंतर या यात्रेने जतच्या उत्तर भागातील ग्रामस्थांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. गावोगावी पदयात्रेचे स्वागत होत आहे. या माध्यमातून रवीपाटील यांनी जत तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली. पदयात्रेचा मुख्य उद्देश जतकरांच्या भावना, अडीअडचणी जाणून घेणे असल्याने रविपाटील यांनी थेट बांधावर जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी डोळयात पाणी आणून आपल्या व्यथा सांगितल्या. शेतीमालाला भाव नाही.योजना पोहोचल्या नसल्याचे सांगितले. तरुणांची, महिलांची भेट घेतली तेव्हा अनेकांनी बेरोजगारीचा मुद्दा मांडला, रविपाटील यांनी शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुण, महिला यांना केंद्रात व राज्यातील भाजप सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.

अनेक योजना आहेत पण स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे त्या पोहचल्या नाहीत हे दुर्दैव असल्याचे सांगत पदयात्रा झाल्यानंतर आपण स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांना भेटू व प्रश्न सोडवू अशी ग्वाही दिली.रविपाटील यांच्या या ग्वाहीनंतर अनेकांनी समाधान व्यक्त केले. तम्मणगौडा रवि पाटील यांच्या या पदयात्रेने जतकरांची मने जिंकली आहेत हे मात्र नक्की.
आईचे छत्र हरपले पण….
तम्मनगौडा रवीपाटील यांच्या मातोश्री, जाडरबोबलादच्या माजी सरपंच दानम्मा ईश्वरप्पा रविपाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला, स्वतःचे दुःख बाजूला ठेवून रवीपाटील यांनी पदयात्रा काढली. आईचे छत्र हरपले, पण आईने दिलेली समाजसेवेची शिकवण पुढे नेण्यासाठीची रविपाटील यांची धडपड बरेच काही सांगून जाते.
रवीपाटील लोकप्रिय ठरले,पदयात्रेनेही वेधले लक्ष
माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे, माजी मंत्री जयंत पाटील यांचे ओएसडी अमोल डफळे यांच्यासह अनेकांनी रवि पाटील यांच्या पदयात्रेत सहभाग नोंदविला. ३०० कि. मी. च्या या पदयात्रेने लक्ष वेधून घेतले आहे. माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यानी तर रवि पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नेतृत्वशून्य कारभारामुळे खुटला जतचा विकास – तम्मणगौडा रविपाटील
पदयात्रेच्या माध्यमातून जेव्हा जतकरांशी संवाद साधला तेव्हा एक गोष्ट स्पष्टपणे निदर्शनास आली की जतला खमके नेतृत्व न लाभल्याने जतचा विकास खुंटला आहे. आजही गावातील प्रश्न जशाच्या तसे आहेत. पाण्यासाठी एकाबाजूला संघर्ष सुरु आहे, तर दुसऱ्या बाजूला आजही विस्तारित योजनेची माहिती सर्वसामन्यांना नाही. लोकप्रतिनिधींनी केवळ घोषणा व आश्वासने दिली आहेत. हे चित्र बदलायचे असेल तर बदल व भूमिपूत्रच हवा असल्याचे तम्मणगौडा रविपाटील यांनी सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here