प्रकाशराव जमदाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शनिवारी लोकार्पण

0
1
जत : भारतीय जनता पार्टी तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण शनिवार ता.३१ ऑगष्टला विविध मान्यवरांच्याहस्ते संपन्न होणार आहे.कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,माजी खासदार संजयकाका पाटील,जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील,माजी आमदार विलासराव जगताप,भाजप संघटक मकरंद देशपांडे, समन्वयक शेखर इनामदार,सिमेंट कॉर्पोरेशन सदस्य डॉ.रवींद्र आरळी, माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक म्हैशाळकर,राज्य कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

तालुक्यातील जनतेच्या शेतकरी कष्टमजूर सर्व सामान्य जनता,माता भगिनी यांचे विविध विभागातील सरकारी योजना, शेतकरी बांधव यांचेसाठी विविध योजना तसेंच विविध महामंडळ,शासकीय योजना जिल्हा मध्यवर्ती बँक यांचे माध्यमातून कर्ज पुरवठा महिला अल्पबचत गट यांच्या योजना,लडकी बहीण योजना तसेंच तालुक्यातील तरुण बेरोजगार युवक व युवती यांना आत्मनिर्भर होण्यासाठी तसेंच कामगार नोंदणी करून त्यांना शासकीय विविध योजना यांचा लाभ देण्यासाठी एका छताखाली सर्व सामान्य नागरिक महिला बहुजन वंचित यांच्या कामाच्या दृष्ठिकोनातून हे कार्यालय सुरू करण्यात येत आहे.शहरातील डफळे कॉलनी ‌पोलीस स्टेशन पाठीमागे हे कार्यालय सुरू होत आहे.
या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास भारतीय जनता पार्टी व प्रकाश जमदाडे जनसंपर्क कार्यालयचा उदघाटन सोहळा सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळी यांचे उपस्थित शनिवारी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न होतं आहे तरी या उदघाटन प्रसंगी जत तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्ष चे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे अहवान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली चे संचालक मा प्रकाश जमदाडे यांनी केला आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here