बाप, सावत्र बाप, काका झाला हैवान | एका घटनेत चिमुरडीवर पित्याचा अत्याचार; अन्यही दोन घटना असाच प्रकार

0
10

जन्मदात्या बापासह, सावत्र बाप आणि काका यांनीच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या तीन घटना गुरुवारी उजेडात आल्याने पुन्हा एकदा समाजमन सुन्न झाले. यातील एक घटना अकोला जिल्ह्यात तर दोन घटना पालघर जिल्ह्यात घडल्या आहेत.

 

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहा वर्षांच्या चिमुरडीवर वडिलांच्या नात्यातील एका वीस वर्षीय युवकाने अत्याचार केला. याप्रकरणी युवक अटकेत असतानाच आता पोलिस तपासादरम्यान त्या चिमुरडीवर जन्मदात्या बापानेही दारू पिऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलीचे आई-वडील नातेवाइकांकडे आले होते. अल्पवयीन मुलीला त्यांच्याकडे ठेवून दोघे बाहेर गेले. यावेळी मुलीच्या वडिलांचा नातेवाईक असलेला यश युवराज गवई याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरू केल्यावर जन्मदात्या बापानेही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले.

 

वसईत सावत्र पिता आणि काकांकडून बलात्कार

■ नालासोपारा : वसईत एका घटनेत सावत्र पिताच १५ वर्षीय मुलीवर तीन

महिन्यांपासून बलात्कार करत होता, तर दुसऱ्या घटनेत काकाने आपल्या १७ वर्षीय पुतणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला आहे. तुळींज व पेल्हार पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणांत गुन्हे दाखल झाले आहेत.

■ पहिल्या घटनेत ४० वर्षीय सावत्र पित्याने १५ वर्षीय मुलीवर सतत तीन महिने बलात्कार केला. अखेर तिने मंगळवारी आईला हा प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपी सावत्र पित्याला अटक केली.

■ दुसऱ्या घटनेतील पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. मंगळवारी दहिसर येथे राहणारे काका तिच्या घरी आले. तेव्हा घरी कुणी नव्हते. त्याने तिला धमकावून तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here