नवी दिल्ली: शाळा असो किंवा कामाचे ठिकाण, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. अशा स्थितीत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘शी-बॉक्स पोर्टल’ हे व्यासपीठ सुरू केले आहे. लैंगिक शोषणाची तक्रार आणि त्यावरील उपाययोजनांसाठी ‘शी-पोर्टल’ तयार करण्यात आले आहे.
शी-बॉक्स’ काय आहे?महिलांना शोषणासंदर्भात तक्रार करणे, त्यावर नजर ठेवणे तसेच तक्रारीवर वेळेत कार्यवाही व्हावी, यासाठी हे पोर्टल मदत करणार आहे. तक्रारींवर रिअल टाइम लक्ष ■ ठेवण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येईल. तक्रारदार महिलांना न्याय मिळेल, हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असेल.
तक्रार कशी करणार? https://shebox.wcd. gov.in/ या ‘शी-बॉक्स पोर्टलवर जावे. तेथे तक्रार नोंदविण्यासाठी ‘रजिस्टर युअर कम्प्लेंट वर क्लिक करा. त्यानंतर तक्रार नोंदवा आणि त्यानंतर तक्रार नोंदवा आस्थती पाहा, असे दोन पर्याय येतील. तक्रार नोंदविण्याच्या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी केंद्र सरकारची सरकारी कार्यालये, हे दोन पर्याय दिसतील. त्यापैकी आपल्याशी संबंधित पर्यायावर क्लिक करा. पर्याय निवडल्यानंतर संबंधित सर्व माहिती भरा आणि तक्रार नोंदवा.प्रत्यक्ष तक्रारींची नोंद ऑक्टोबरपासून सध्या केंद्र, राज्य सरकारच्या अंतर्गत समिती स्थापन करण्याचे कार्य सुरू आहे. प्रत्यक्षात तक्रारी नोंदविण्याचे काम ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
देशातील महिलांसाठी सुरक्षित आणि अधिक समावेशी कामकाजाचे वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच लैंगिक शोषणाच्या तक्रारी सोडविण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त कुशल आणि सुरक्षित व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध करता येणार आहे.
-अन्नपूर्णा देवी, केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री