प्रकाशा (जि. नंदुरबार) : नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना प्रकाशा येथे उघडकीस आली आहे. शहादा पोलिसांत शनिवारी दुपारी आईने फिर्याद दिल्याने बापाविरुद्ध बलात्कार व ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली.
१३ वर्षीय मुलीवर तिच्याच बापाने एप्रिल व जुलै महिन्यांत वेळोवेळी अत्याचार केले. घरात कुणी नसल्याची संधी साधत तो तिच्यावर अत्याचार करीत होता. या अत्याचारातून बालिका गरोदर राहिली. ही बाब आईला समजल्यावर तिने फिर्याद दिली.
शिक्षकाने केले अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
मालेगाव कॅम्प : मालेगाव तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाने इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकाराची माहिती मुलीने नातेवाइकांना सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी शिक्षकाला नाशिक येथून जेरबंद केले आहे.
■ एका वस्तीशाळेवर शिक्षक असलेल्या संशयित जिभाऊ खैरनार (वय ५४) याने चौथी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या दहावर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले.