बापरे…! काय सांगता, वडपाव पाच लाख रुपयांना !

0

पुणे : बापरे..! काय,सांगता… वडापाव पाच लाख रुपयांना पडला. पैसे खाली पडल्याचे सांगून चोरट्यांनी चक्क पाच लाख रुपयांच्या दागिन्यांची पिशवी घेऊन धूम ठोकली. ही घटना गुरुवारी (दि. २९) शेवाळेवाडी (ता. हवेली) येथील रोहित वडेवाले येथे घडली. याप्रकरणी दशरथ धामणे (वय ६९, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धामणे दागिने सोडवून घेऊन घरी जात असताना वाटेत वडापाव खाण्याची इच्छा झाली. पत्नीला दुचाकीजवळ थांबवून ते वडापाव आणायला गेले. इकडे चोरट्यांनी पैसे खाली पडल्याचा बहाणा करून पाच लाख रुपयांचे दागिने असलेली दुचाकीवरील पिशवी चोरून धूम ठोकली.पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी व त्यांची पत्नी सेवानिवृत्त आहेत.

 

 

त्यांनी ऊरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे तारण म्हणून ४ लाख ९५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. गुरुवारी (दि. २९) त्यांनी ते दागिने सोडवून आणले. दागिन्यांची पिशवी त्यांनी दुचाकीला लावली होती. वाटेत रोहित वडेवाले या दुकानासमोर त्यांनी गाडी उभी केली. पत्नीला तेथेच थांबायला सांगून ते वडापाव घेण्यासाठी दुकानात गेले. इतक्यात त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांपैकी एक जण मोटारसायकलवर आला.

Rate Card

त्याने त्यांच्या पत्नीला पैसे खाली पडले असल्याचे सांगितले. ते पाहून त्यांची पत्नी पैसे घेण्यासाठी दुचाकीच्या मागच्या बाजूला गेल्या. ही संधी साधून दुसऱ्या चोरट्याने दुचाकीला लावलेली दागिन्यांची पिशवी चोरून नेली. पोलीस नाईक पांडुळे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.