तासगाव बाजार समितीतील अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा | विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांचे तासगाव पोलिसांना पत्र : मनसेच्या पाठपुराव्यास यश

0
तासगाव : येथील राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपहार झाला आहे. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधी झालेल्या लेखापरीक्षणातून हा अपहार चव्हाट्यावर आहे आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे पत्र विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी तासगाव पोलिसांना दिले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमोल काळे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यानिमित्ताने यश येताना दिसून येत आहे.
विशेष लेखापरीक्षक यांनी तासगाव पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीतील लेखापरिक्षण पूर्ण केले आहे. त्याचा लेखापरिक्षणचा अहवाल दि. 9 जानेवारी 2024 रोजी सादर केला आहे.
या लेखापरीक्षणाअंती निदर्शनास आलेल्या अपहाराचा विशेष अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये झालेला अपहार हा विस्तारीत बाजार समितीच्या बांधकामाच्या अनुषंगाने झाला आहे. तरी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
Rate Card
मनसेचा अडीच वर्षे पाठपुरावा..!
मनसेचे नेते अमोल काळे हे गेली अडीच वर्षे तासगाव बाजार समितीतील या अपहाराचा पाठपुरावा करत आहेत. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक विलंब लावला. मात्र त्यांनी लोकशाही मार्गाने अनेकदा आंदोलनाचा इशारा देत हा विषय मार्गी लावला आहे.
*आंदोलन तात्पुरते स्थगित : काळे*
बाजार समिती अपहरण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत, या मागणीसाठी मनसे नेते अमोल काळे हे 4 सप्टेंबर पासून तासगाव बाजार समितीसमोर उपोषणास बसणार होते. मात्र विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी आम्ही गुन्ह्याची प्रक्रिया चालू केली असून उपोषण थांबवावे, अशी विनंती केल्याने हे उपोषण तात्पुरते थांबवत आहोत, असे अमोल काळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.