‘भाऊ’, ‘दादा’, ‘काका’ हवंय? आवडीच्या नंबरसाठी मोजा दुप्पट पैसे | राज्य सरकारची नव्याने अधिसूचना जारी

0

सर्वांचे लक्ष वेधून घेईल, असा नंबर आपल्या वाहनाला मिळावा, यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) जादा पैसे मोजण्याचीही अनेकांची तयारी असते.

 

अशाच हौशी लोकांना आता त्यांना हवा तसा गाडीनंबर मिळविण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारने ‘व्हीआयपी’ वाहन क्रमांकाच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. तशी अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली.

 

१८६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त शुल्कवाढीमुळे परिवहन विभागाच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत दोन लाख २० हजार २८० जणांनी पसंतीचे वाहन क्रमांक खरेदी केल्याने १८६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

 

ज्याला त्याला हवा ‘०००१’ अलीकडच्या अलीकडच् काळात उच्चपदस्थ अधिकारी, वलयांकित व्यक्ती, राजकारणी, बड़े उद्योगपती, तसेच हौशी मंडळी विशिष्ट क्रमांकासाठी आग्रही असतात. त्यांना त्यांच्या वाहनासाठी ठरावीकच नंबर हवा असतो. विशेषतः ०००१ हा नंबर आपल्या गाडीला मिळावा यासाठी चढाओढ असते. त्यासाठी आतापर्यंत तीन लाख रुपये शुल्क आकारले जात होते. ते आता सहा लाख रुपये करण्यात आले आहे, तसेच याच क्रमांकासाठी अर्ज केल्यास त्याचा लिलाव करून अर्जदाराला त्याच्या तिप्पट रक्कम १८ लाख रुपये जमा करावी लागणार आहे. दुचाकींच्या बाबतीत ‘०००१ नंबरचे शुल्क ५० हजारांवरून एक लाखापर्यंत वाढविले. मालिकेत नसलेल्या नंबरच्या आग्रहासाठी ही रक्कम तिप्पट होईल.

Rate Card

 

या नंबरसाठी मोजा अडीच लाख रुपये ०००९, ००९९ आणि ९९९९ या नंबरसाठी चारचाकीधारकांना अडीच लाख रुपये मोजावे लागतील, तर दुचाकीधारकांना ५० हजार रुपये शुल्क भरावे लागेल. अशा विशिष्ट ४९ अतिरिक्त क्रमांकांसाठी चारचाकीधारकांना ७० हजार रुपये, तर दुचाकीला १५ हजार रुपये शुल्क द्यावे लागले. १८९ पसंतीच्या क्रमांकांची रक्कम २५ हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे

 

तब्बल ११ वर्षांनी वाढविण्यात आले शुल्कः ■ पसंतीच्या क्रमांकांसाठी ११ वर्षांन शुल्क वाढविण्यात आले आहे. २४० असे व्हीआयपी क्रमांक राज्य शासनाने प्रत्येक मालिकेसाठी निश्चित केले आहेत. ■ १६ असे इतर लोकप्रिय क्रमांक आहेत, ज्यांचे शुल्क कारसाठी १ लाख आणि दुचाकींसाठी २५ हजार रुपये असेल. ■ ४८८ एकूण लोकप्रिय क्रमांक प्रत्येक मालिकेसाठी सरकारने निश्चित करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.