बेधडक शर्वरीचे बिनधास्त बोल
महाराज’ आणि ‘वेदा’ या चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनयाचं दर्शन घडवल्यानंतर शर्वरी वाघ सध्या आपल्या आगामी ‘अल्फा’ चित्रपटाच्या कामात बिझी आहे. रूपेरी पडद्यावर बेधडक व्यक्तिरेखा साकारणारी शर्वरी वास्तवातही बिनधास्त बोलणारी आहे.
एका मुलाखतीत तिने रिलेशनशिपबाबतची आपली स्पष्ट मतं मांडली आहेत. ती म्हणाली की, नात्यामध्ये मी धोका खपवून घेऊ शकत नाही. जर मी एखाद्याला डेट करत असेन तर धोका देण्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हा आपल्यासाठी एक मोठा मुद्दा असल्याचंही शर्वरी म्हणाली. शर्वरीचं नाव सध्या विकी कौशलचा भाऊ सनी कौशलशी जोडलं जात आहे. शर्वरी-सनी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे; पण दोघंही याबाबत मौन बाळगणंच पसंत करत आहेत.