तासगावातील ढवळवेस येथे भरपावसात डांबरीकरण

0तासगाव : तासगाव शहरातील ढवळवेस येथे भरपावसात डांबरीकरण सुरू होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक वैभव भाट यांनी हे निकृष्ठ काम बंद पाडले. या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.शहरात लाखो रुपये खर्चून भुयारी गटारींची कामे सुरू आहेत. या कामांसाठी शहरातील अंतर्गत रस्ते ठिकठिकाणी उकरले आहेत. दोन वर्षांपासून सुरू असणारे गटारींचे काम आजतागायत निम्मेही झाले नाही. अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे. शिवाय ठिकठिकाणी रस्ते उकरल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.


     

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.