विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला अथक परिश्रमानंतर जीवदान

0

आवंढी,संकेत टाइम्स : शिंदेवाडी (ता.जत) येथील महादेव पवार यांच्या शेतातील विहिरीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अन्नाच्या शोधात असलेला कोल्हा पडला होता.

पवार व स्थानिक नागरिकांनी जत वनविभागाशी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली.वनविभाच्या कर्मचाऱ्यांनीही कार्यतत्परता दाखवत पिंजरा,दोर व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी हजर झाले.विहिरीत अडीच ते तीन परुस पाणी असल्याने कोल्हा पाण्यात पोहत होता,ओरडत होता. 

रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत कर्मचार्यांनी स्थानिकांच्या मदतीने कोल्ह्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढत,पिंजऱ्यात कोंडून वनक्षेत्रात सोडून दिले.यादरम्यान कोल्ह्याला कसल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.वनविभागाच्या कर्मचार्यांनी वेळेत हालचाल केली नसती तर कोल्ह्याला आपले प्राण गमवावे लागले असते. यामुळे परिसरातील नागरिकांकडून कर्मचाऱ्यांचे कौतूक होत आहे.वनपाल श्री.गडदे,वनरक्षक श्री.मुसळे,कर्मचारी भारत कोडग यांनी स्थानिकांच्या मदतीने ही मोहिम फत्ते केली.

Rate Card


वनविभागाने विहिरीत‌ पडलेल्या सुरक्षित‌ बाहेर काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.