जत : प्रकाशराव जमदाडे युथ फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार : जाहीर केले आहेत. रविवारी जत येथील साईप्रकाश मंगल । कार्यालयात सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक तथा प्रकाशराव जमदाडे युथ फौंडेशनचे प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पं.स.चे माजी विरोधी पक्षनेते रवींद्र सावंत उपस्थित होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार विलासराव जगताप राहणार आहेत. शिवाजीराव खांडेकर यांच्याहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. इस्लामपूर येथील डॉ.अर्चना थोरात यांचे व्याख्यान होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे, प्राथमिक विकास पतसंस्थेचे चेअरमन संभाजी जगताप, गटशिक्षणाधिकारी राम फारकांडे, आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अभय जमदाडे, सचिव विजय रुपनूर, उपाध्यक्ष औदुंबर पोतदार यांनी केले आहे.