सांगली : जावयाने सासऱ्याच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना कर्नाळ (ता. मिरज) येथे ३ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी शिवाजी कृष्णा रास्ते (वय ६५, मूळ गाव गोंधळेवाडी, ता. जत सध्या कर्नाळ, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार जावई गजानन प्रकाश लोखंडे (वय ३०, रा. सोनी, ता. मिरज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रास्ते यांचे जावई गजानन व मुलीत काह कारणांनी वाद झाला होता. हा वाढ मिटवून तिला घरी घेऊन जाण्यासाठी रास्ते यांनी गजाननाच्या भावाला सांगितले होते. त्यानंतर जावई गजानन् हा कर्नाळ येथे आला. त्याला रास्ते यांनी घरात बोलाविले. यावर त्याने शिवीगाळ करीत घराबाहेर पडलेला दगड घेऊन त्यांच्या डोक्यात मारला तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.