करजगी येथील या नेत्याची शेतकरी सल्लागार समिती सदस्यपदी निवड

0

करजगी,संकेत टाइम्स : मोरबगी गावचे सुपुत्र हनमंतराव भीमशा नंदुर यांची जत तालुका शेतकरी सल्लागार समिती सदस्य निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी हनमंतराव नंदुर म्हणाले,माझ्यावर आमदार विक्रमसिंह सांवत यांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावू.दिलेल्या संधीचे सोने करू,यापुढील काळात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन करून त्यांच्या कृषी विषयक समस्या सोडविण्यास सतत प्रयत्न करत राहणार असल्याचे नंदूर म्हणाले.

यावेळी सरपंच कविता मांग,उपसरपंच राजकुमार नंदुर,सदस्य मल्लिकार्जुन मठ,परमेश्वर खरात,भीमराव कांबळे,शिवानंद बिरादार,शिवाप्पा कारकल, 


Rate Card
तीप्पणा बिरादार ,अशोक बिरादार,शिवानंद बिरादार,संतोष पाटील, गणपती मांग,दुर्गप्पा मांग, सुभाष बिरादर,ग्रामसेवक दत्ता माने, प्रशांत सोनकनळी, ईश्वर बालगाव,शिवानंद परीट,चंद्रकांत दंधरगी व ग्रामस्थ उपस्थित होते.करजगी : शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य हनमंतराव नंदुर यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.