जतेत एका डॉक्टरांच्या बुलेटची घरासमोरून चोरी

0जत,संकेत टाइम्स : 

जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात ओसरत असतानाचं चोरट्यांनी 

पुन्हा डोकेवर काढले असून गेल्या आठवड्यात शहरातील घरासमोर लावलेल्या चार-पाच महागड्यात दुचाकी चोरून नेहण्याच्या घटना घडल्या आहेत.


पोलीसांना आवाहन देत चोरटे सक्रीय झाले आहेत.बुधवार (ता.2) ला जत शहरातील बेलदार गल्लीत राहणारे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.विद्याधर रावसाहेब पाटील यांच्या घरासमोर लावलेली बुलेटही अज्ञात चोरट्यांनी पळवून नेहली आहे.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

जत शहरात गेल्या तीन महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याने भितीचे वातावरण पसरले होते.प्रत्येकजण आपण वाचलो पाहिजे म्हणून खबरदारी घेत होता.

त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण पुर्णत:घटले होते.मात्र गेल्या आठवड्यापासून कोरोना प्रभाव ओसरू लागताच चोरट्यांनी डोके वर काढले आहे.गेल्या दोन आठवड्यात महागड्या दुचाकी चोरट्यांनी पळवून नेहल्याच्या घटना घडल्या आहेत.

नुकतीच येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.विद्याधर पाटील यांची बेलदार गल्ली येथील घरासमोर लावलेली दिड लाख रूपये किंमतीची रॉयल इनफिल्ड बुलेट (एमएच 10,सीवाय 8136) ही दुचाकी घरासमोरून शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी पळवून नेहली आहे.

Rate Card

तालुक्यात यापुर्वीही अनेक दुचाकी चोरट्यांच्या टोळ्या पोलीसांनी पकडलेल्या आहेत.अद्यापही मोठ्या प्रमाणात दुचाकी गायब आहे.त्याचे तपास वर्षोनु वर्षे लागलेले नसतानाच थांबलेल्या चोऱ्यां पुन्हा सुरू झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
आता कुठे कोरोनातून नागरिक सावरत असतानाच चोरट्यांनी सुरु केलेला नंगानाच मुळे भितीचे वातावरण पसरले आहे.जत शहरातून गेल्या दोन आठवड्यात चार-पाच दुचाकी चोरट्यांनी पळवून नेहल्याच्या घटना समोर येत आहेत.


जत ठाण्याला नव्याने लाभलेले पोलीस निरिक्षक श्री कोळी अनुभवी अधिकारी आहेत.त्यांनी पुन्हा सक्रीय झालेल्या चोरट्यांचा बंदोबस्त करून चोरीला गेलेल्या दुचाकी परत मिळवून द्याव्यात,अशी मागणी होत आहे.


जत शहरातील डॉ.विद्याधर पाटील यांची चोरीला गेलेली बुलेट

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.