आरपीआयचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र राज्य सरकारने आरक्षण शिवाय सेवाज्येष्ठते नुसार मागासवर्गीय पदोन्नतीतील सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय 7 मे 2021 रोजी घेतलेला आहे,त्याच्या विरोधात व निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार दिनांक 1 जून ते 7 जून पर्यंत निदर्शने सप्ताह जाहीर केला आहे.राष्ट्रीय अध्यक्ष आणि आठवले यांच्या आदेशाने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलने करून शासनाचा निषेध केला. मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना पदोन्नती देण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले.


पदोन्नतील 33 टक्के आरक्षित पदे तात्काळ बिंदुनामावली प्रमाणे भरण्यात यावीत.मराठा आरक्षण प्रमाणे मागासवर्गीय पदोन्नती बाबत राज्य सरकारचा निष्काळजीपणा दिसून येत आहे त्यामुळे मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण समितीचे अध्यक्ष अजित पवार यांना पदावरून हटवावे पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपद मागासवर्गीय मंत्र्यांना द्यावे 2018 च्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाडा नुसार पदोन्नती आरक्षण व इतर जागा बिंदुनामावली प्रमाणे भरण्यात याव्यात सप्टेंबर 2018 च्या चिप जेष्ठीस दीपक मिश्रा यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडा नुसार अनसुचित जाती-जमाती यांना मागासलेपण सिद्ध करण्याची गरज नाही 


त्यामुळे तात्काळ मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाची अंमलबजावणी करावी त्यामुळे  अन्यायकारक शासन निर्णय सरकारने मागे घ्यावा अशा पद्धतीच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी मराठा समाजातील काही मूठभर जनता श्रीमंत आहे पण उर्वरित समाज आजही गोरगरीब व दारिद्र्यात जीवन जगत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी तसेच मागासवर्गीय समाजावर होणारे ग्रामीण भागातील अन्याय अत्याचार बंद व्हायला पाहिजे व सन्मानाची वागणुक मिळावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली. मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांना तात्काळ पदोन्नती द्यावी व शासन अन्यायकारक निर्णय रद्द करावा.बिंदूनामावली प्रमाणे नोकर भरती करावी अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली. विनोद कांबळे,दर्गापा ऐवाळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.Rate Card
यावेळी भाजपचे नेते प्रभाकर जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य राजू खाडे,भारतीय होलार समाज संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब ऐवळे,दलित महासंघाचे विलास देवकुळे,वंचित आघाडीचे प्रशांत झेंडे,माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष रविकांत साबळे,युवा नेते रवींद्र मानवर बाजी केंगार यांनी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.प्रांत प्रशांत आवटी तहसीलदार, सचिन पाटील निवेदनं स्विकारले आपल्या मागण्या राज्य सरकारकडे पोहचले जाईल असे सांगितले.


यावेळी किशोर चव्हाण,तालुकाध्यक्ष संजय मल्लपा कांबळे,उपाध्यक्ष राहुल चंदनशिवे,लक्ष्‍मण कांबळे,सरचिटणीस प्रशांत ऐदाळे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुभाष कांबळे,हेमंत चौगुले,संभाजी ऐवळे,रणजीत साबळे,वसंत कांबळे, शशिकांत साबळे,राहुल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.मागासवर्गीय आरक्षण रद्दचा शासन अन्यायकारक निर्णय रद्द करावा या मागणीचे ‌निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.