जत शहरातील विजापूर गुहागर या महामार्गावर असलेल्या बँक ऑफ इंडिया या बँकेतून बाळासाहेब नामदेव पाटील (वय ५३ रा. उमराणी रोड, पाटील मळा) यांच्या बॅगेतून एक लाखाची रक्कम लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला आहे
विजापूर-गुहागर या महामार्गावर बँक ऑफ इंडियाची शाखा कार्यरत आहे बाळासाहेब पाटील जत येथील सिद्धार्थ पब्लिक स्कूलमध्ये कर्मचारी आहेत. पाटील यांनी दुपारी बँकेतून दोन लाख सात हजारांची रक्कम काढली.
यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामुळे बँकेत महिलांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे बँकेतच हा चोरीचा प्रकार घडला आहे. बाळासाहेब पाटील यांनी बँकेतून काढलेली दोन लाख सात हजारांची रक्कम आपल्या बॅगेत ठेवली होती. बँकेतून बाहेर पडण्यापूर्वी ही रक्कम लंपास झाली होती.