विविध मागण्यासाठी बांधकाम कामगार २३ संप्टेबरला कामगार मंञ्यांच्या घरावर मोर्चा काढणार

0
2
जत : बांधकाम कामगारांना यावर्षी दिवाळीपूर्वी 20 हजार रुपये दिवाळी भेट द्या,तपासणी ते उपचार या योजनेमध्ये आई – वडिलांचा समावेश करा, नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभाची स्लॉट पद्धत बंद करा, भांडी सेट देताना आप पर भाव थांबवा यासह अन्य मागण्यासाठी 23 सप्टेंबर 2024 रोजी कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय लाल बावटा बांधकाम कामगार संघटना आणि बांधकाम कामगार फेडरेशन सिटू यांच्यावतीने घेण्यात आला आहे.
बांधकाम मंडळाकडे हजारो कोटी रुपये शिल्लक असताना सुद्धा या सरकारने गेल्या चार वर्षात बांधकाम कामगारांना दिवाळी साजरी करण्यासाठी काहीही दिलेले नाही.तपासणी ते उपचार या योजनेत एका कामगारांचे रक्त तपासायला 3900 रुपये असे घरातील चार लोकांचे रक्त तपासणी केली जाते.यात कंपनी प्रचंड कमाई करते मात्र या योजनेमध्ये आई वडिलांचा समावेश केला जात नाही. कामगारांचा कोणत्याही लाभाचा अर्ज आज अपडेट मारला तर त्यामध्ये व्हेरिफायसाठी 13 महिन्याची तारीख मिळते.घरबांधणी योजना फक्त 1.5 लाख रुपयाची आहे.मंत्री महोदयांनी 4.5 लाख रुपये घोषित करून दोन वर्षे झाली मात्र अंमलबजावणी नाही.
कामगार मयत झाल्यावर त्याचे विवाह नोंदणीचे सर्टिफिकेट मागितले जाते.Boc आणि Wfc कार्यालयात एजंटचे काम लवकर होते,मात्र युनियनच्या कामगारांना तिष्टत ठेवले जाते.जुन्या कामगारांचे नूतनीकरणाचे अर्ज तपासणीला मुंबईला जातात.अनेक कामगारांचे लाभाचे अर्ज मंजूर होऊन वर्षापेक्षा जास्त काळ होऊन सुद्धा त्यांचे खात्यात पैसे आलेले नाहीत.जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामसेवक काम केलेचा दाखला कामगारांना देत नाहीत.इंजिनीरिंगचे अनेक कोर्स आहेत मात्र त्यातील काही मंडळाच्या यादीत नाहीत.या प्रश्ना बाबत मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी गेल्या वर्षभरात पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.राज्यभर अनेक प्रश्न पेंडिंग आहेत,ते सोडवून घेणेसाठी कामगार मंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे तसेच राज्यातील 17 जिल्ह्यातून बांधकाम कामगार उपस्थित राहणार आहेत.या मोर्चास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नोंदीत आणि लालबावट्याचे कार्ड असलेल्या बांधकाम कामगारांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन कॉ उमेश देशमुख,कॉ रेहाना शेख,कॉ हणमंत कोळी,कॉ मिना कोळी,कॉ तुळशीराम गळवे,संजय सुर्यवंशी,वृषभ कोळी,प्रशांत नाईक,बसवराज स्वामी,जावेद नदाफ,नाना बुवा यांनी केले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here