शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या युवकाची धिंड

0
7
Crime scene barricade covering. Murder case of a criminal young male.

जत शहरातील एका सतरा वर्षीय शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली. जत शहरातून त्याची धिंड काढण्यात आली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची मुलगी जत शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. सकाळी ती खासगी क्लासला जाते. संशयितांचे मोबाईल दुकान आहे. रशिद शाळेत जाणाऱ्या या शाळकरी मुलीकडे वाईट नजरेने बघणे, हातवारे व इशारे करणे असे प्रकार करत होता. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सदरची मुलगी व तिची मैत्रीण क्लासला जात होते.संशियताने दुचाकीवरून येऊन रस्त्यात तिला गाठले. मला तू आवडतेस, तुझ्यावर माझे प्रेम आहे म्हणून मुलीला कॅडबरी देण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मुलगी घाबरली व घरी जाऊन घडलेला प्रकार तिने नातेवाईकांना सांगितला.
नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला व फिर्याद दाखल केली. पोलिसांनी मोबाईल दुकानातून मोहसीन अलीला ताब्यात घेतले. त्याची शहरातून धिंड काढून त्यास पोलीस ठाण्यात आणले. त्याची दुचाकी जप्त
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here