कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथील मरोळ रस्त्याजवळ दत्त मंदिर येथे विहिरीमध्ये पोहताना फिट येऊन एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना कवटेमहाकांळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, म्हापसा (उत्तर गोवा) येथील तरुण सागर शिवाप्पा वाघमारे (वय २१) हा घाटनांद्रे येथे उपचारासाठी नवनाथ मठात आला होता. तो दत्त मंदिराजवळील विहिरीत अंघोळीसाठी गेला होता. पोहताना अचानक फीट आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती घाटनांद्रे येथील महादेव विलास शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे कवठेमहांकाळ पोलिसांना कळवली. त्यानंतर तत्काळ पोलिस हेडकॉन्स्टेबल पडळकर व कॉन्स्टेबल कासार यांनी घटनास्थळाची पाहणी करून प्राथमिक तपास केला.